महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वीजबिल माफीसाठी भाजपचे टाळेबंदी आंदोलन; महावितरणसमोर निदर्शने - भाजपचे वीजबिलाविरोधात आंदोलन

कोरोना काळात महावितरणने भरमसाठ वीजबिले आकारली. राज्य शासनाने आधी यात सूट देण्याचे आश्वासन दिले मात्र नंतर त्यांनी घुमजाव केले. त्यामुळं विरोधी पक्ष भाजपने याचा निषेध करण्यासाठी आज 'ताला ठोको' आंदोलन केलं.

BJP agitation for electricity bill waiver;
BJP agitation for electricity bill waiver;

By

Published : Feb 5, 2021, 6:42 PM IST

Updated : Feb 5, 2021, 6:51 PM IST

चंद्रपूर - कोरोना काळामुळे लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. त्यात महावितरणने भरमसाठ वीजबिले आकारली. राज्य शासनाने आधी यात सूट देण्याचे आश्वासन दिले मात्र नंतर त्यांनी घुमजाव केले. त्यामुळं विरोधी पक्ष भाजपने याचा निषेध करण्यासाठी आज 'ताला ठोको' आंदोलन केलं.

भाजपचे टाळेबंदी आंदोलन
चंद्रपूर येथील महावितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर हे आंदोलन करण्यात आले. शहर भाजपच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कार्यालयाला पोलीस संरक्षण देण्यात आले होते. त्यामुळे टाळे ठोकता आले नाही. पण लोकांचा वीज बिल माफीचा मुद्दा यानिमित्तानं भाजपनं निदर्शनं करून जिवंत ठेवला. याप्रसंगी शासनविरोधी नारेबाजी करण्यात आली. सर्वसामान्य ग्राहकांना हजारो रुपयांची वीज बिलं आल्याने त्याचा भरणा करणे अवघड होत आहे. या बिलात अनेक कर लावण्यात आले आहेत.

त्यामुळे इतके अवाढव्य बिल भरायचे कसे, हा सर्वात मोठा प्रश्न ग्राहकांच्या समोर उपस्थित झाला आहे. अशातच महावितरण कंपनीने कठोर भूमिका घेत अशा ग्राहकांची वीज कापण्याचा निर्णय घेतलाय. यामुळे लोकांत असंतोष निर्माण झालाय. भाजपनं याच मुद्द्यांवर हे आंदोलन करीत सरकारने सामान्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी केली. हे आंदोलन जिल्ह्यातील सर्व ठिकाणी करण्यात आलं.

Last Updated : Feb 5, 2021, 6:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details