महाराष्ट्र

maharashtra

आयएमएच्या संपाचा निमाकडून निषेध; गुलाबी फीत लावून लावून जादावेळ काम करणार डॉक्टर

By

Published : Dec 10, 2020, 8:41 PM IST

Updated : Dec 10, 2020, 8:52 PM IST

अ‌ॅलोपॅथी डॉक्टरांनी या राजपत्राला आयुषची सळमिसळ असे संबोधले आहे. यामुळे अ‌ॅलोपॅथीमध्ये घुसखोरी होणार असा आरोप केला जात आहे. मात्र, आजही आयुषचे डॉक्टर तळागाळातील लोकांना सेवा देत असल्याचे निमा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे.

निमा संघटनेची पत्रकार परिषद
निमा संघटनेची पत्रकार परिषद

चंद्रपूर - आयुषच्या डॉक्टरांना 58 प्रकारच्या शस्त्रक्रिया परवानगी देण्याच्या निर्णयाविरोधात इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर 11 डिसेंबरपासून संपावर जाणार आहेत. मात्र, या संपात आयुषचे डॉक्टर सहभागी होणार नाहीत. तर निमा संघटनेचेचे डॉक्टर गुलाबी फीत लावून अधिकवेळ काम करून सरकारच्या निर्णयाचे समर्थन करणार आहेत. ही माहिती संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत दिली.

अ‌ॅलोपॅथी डॉक्टरांचा राजपत्राला विरोध; तर निमा संघटनेकडून स्वागत

अ‌ॅलोपॅथी डॉक्टरांनी या राजपत्राला आयुषची सळमिसळ असे संबोधले आहे. यामुळे अ‌ॅलोपॅथीमध्ये घुसखोरी होणार असा आरोप केला जात आहे. मात्र, आजही आयुषचे डॉक्टर तळागाळातील लोकांना सेवा देत असल्याचे निमा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. अ‌ॅलोपॅथी डॉक्टरांची संख्या कमी असल्याने आयुषच्या डॉक्टरांनी ही सेवा आपल्या खांद्यावर घेतली आहे. कोरोनाच्या काळात अनेक अ‌ॅलोपॅथी डॉक्टर हे सेवा देण्यास पळवाट काढत होते. त्यावेळीदेखील ही स्थिती आयुषच्या डॉक्टरांनी सांभाळली आणि सांभाळत आहेत. अशावेळी काही किरकोळ शस्त्रक्रिया करण्याची परवानगी आयुषच्या डॉक्टरांना दिली. मात्र, यातही आयएमएच्या पोटात दुखत आहे. ही त्यांची एकाधिकारशाही आहे, अशी प्रतिक्रिया निमा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

आयएमएच्या संपाचा निमाकडून निषेध

पत्रकार परिषदेला मोठ्या प्रमाणात डॉक्टरांची उपस्थिती-

आयएमएच्या संपाविरोधात आयुषचे डॉक्टर संपूर्ण वेळ काम करणार आहेत. इतकेच नव्हे तर जास्त वेळ देऊन ते या राजपत्राचे समर्थन करणार असल्याची माहिती निमा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. यावेळी पत्रकार परिषदेत निमा केन्द्रीय शाखेचे वरिष्ठ उपाध्यक्ष डॉ. राजू ताटेवार, महाराष्ट्र निमा राज्य शाखेचे सहसचिव डॉ. दिपक भट्टाचार्य, विभागीय सचिव डॉ. सुधीर मत्ते उपस्थित होते. तसेच निमा चंद्रपुर शाखेचे अध्यक्ष डॉ. एल. आय. सरबेरे, सचिव डॉ. विजय भंडारी, कोषाध्यक्ष डॉ. अमित कोसुरकर व वरिष्ठ निमा सदस्य डॉ. मनोहर लेनगुरे, डॉ. मेघराज चंदनानी, डॉ.प्रदीप मोहर्ले, डॉ.यशवंत सहारे, डॉ. भूपेंद्र लोढ़िया, डॉ. नितिन बिस्वास, डॉ. शील दुधे, डॉ. वैभव अडगुरवार, डॉ गोपाल सरबेरे आदी निमाचे सदस्य उपस्थित होते.

जादा काम करू- निमा संघटना

निमा संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. लक्ष्मीनारायण सरबेरे म्हणाले, की आम्ही सरकारच्या निर्णयाचे स्वागत करतो. आयएमएच्या संपाचा निषेध करतो. त्यांच्या संपामुळे आरोग्य सेवा विस्कळित होण्याची शक्यता आहे. रुग्णसेवेत हेळसांड होऊ नये, म्हणून जादा काम करणार आहोत. सरकारच्या निर्णयाला आमचा पाठिंबा आहे.

काय आहे डॉक्टरांच्या संघटनेतील वाद?

भारतीय चिकित्सा केंद्रीय परिषदेने शल्य व शालाक्य विषयाच्या पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या डॉक्टरांना शस्त्रक्रिया करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याचे स्वागत आयुषच्या सर्व संघटनांनी केले आहे. या माध्यमातून तीन वर्षांचे पदव्युत्तर घेतल्यानंतर विविध शस्त्रक्रियांच्या माध्यमातून सेवा देणाऱ्या आयुष डॉक्टरांना कायदेशीर अधिकार प्राप्त झाला आहे. मात्र, यावर इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्षेप घेतला. या कायद्याला स्थगिती देण्यासाठी त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने यावर स्थगिती देण्यास स्पष्ट नकार दिला. सर्वोच्च न्यायालयानेदेखील यावरची याचिका फेटाळून लावली.

Last Updated : Dec 10, 2020, 8:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details