महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

चंद्रपुरात आश्रम शाळेच्या अधीक्षकाची शाळेच्या आवारात आत्महत्या - सुभाष पवार आत्महत्या

पिट्टीगुडा गावातील खेमाजी नाईक आश्रमशाळेत ही घटना घडली. संस्थाचालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. तशी चिट्ठी सापडल्याचेही सांगितले जात आहे.

sui
आश्रम शाळेतील अधिक्षकाची शाळेच्या आवारात आत्महत्या

By

Published : Dec 25, 2019, 10:55 AM IST

चंद्रपूर -जिवती तालुक्यातील पिट्टीगुडा येथील आश्रमशाळेच्या अधीक्षकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सुभाष पवार (वय ४२), असे मृत अधीक्षकाचे नाव आहे. सुभाष यांनी शाळेच्या आवारातच आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा -धक्कादायक खुलासा: शेतकरी आत्महत्येस खते, बी-बियाणे कंपनी जबाबदार

पिट्टीगुडा गावातील खेमाजी नाईक आश्रमशाळेत ही घटना घडली. संस्थाचालकाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप मृताच्या नातेवाईकांनी केला आहे. तशी चिट्ठी सापडल्याचेही सांगितले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details