महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना चाचणीसाठी जादा दर आकारल्यास कारवाई : चंद्रपूर जिल्हा शल्य चिकित्सक - corona test charges news

जिल्ह्यात एकूण 17 खासगी अ‌ॅन्टीजन टेस्टिंग सेंटर कार्यरत असून त्यांच्यासाठी शासनाने शुल्क जास्तीत जास्त रू. 800 ठरवून दिले आहे. यापेक्षा जास्त शुल्क आकारता येत नाही.

corona test
corona test

By

Published : Dec 10, 2020, 12:55 PM IST

चंद्रपूर - कोरोना तपासणीकरिता जिल्ह्यातील जे खासगी अ‌ॅन्टीजन टेस्टिंग सेंटर शासनाने ठरवून दिलेल्या शुल्कापेक्षा अधिक दर आकारत असल्याचे आढळून आल्यास त्या सेंटरचा परवाना रद्द करून प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, अशी सूचना जिल्हा शल्य चिकित्सक निवृत्ती राठोड यांनी दिली आहे.

एकूण 27 ठिकाणी नि:शुल्क केंद्र कार्यरत

आयुर्वैज्ञानिक संस्था तथा सार्वजनिक आरोग्य विभागामार्फत महाराष्ट्र शासनाच्या मार्गदर्शन सूचनांनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील शासकीय तथा महानगरपालिका स्तरावर कोविड-19च्या अ‌ॅन्टीजन टेस्टिंगसाठी अ‌ॅन्टीजन टेस्टींग सेंटर व आर. टी. पी. सी. आर. टेस्टिंग सेंटर अशा एकूण 27 ठिकाणी नि:शुल्क केंद्र कार्यरत करण्यात आली आहेत. या केंद्रांवर कोणत्याही प्रकारचे सेवा शुल्क आकारण्यात येत नाही. तसेच जिल्ह्यात एकूण 17 खासगी अ‌ॅन्टीजन टेस्टिंग सेंटर कार्यरत असून त्यांच्यासाठी शासनाने शुल्क जास्तीत जास्त रू. 800 ठरवून दिले आहे. यापेक्षा जास्त शुल्क आकारता येत नाही.

'800पेक्षा जास्त चाचणी शुल्क आकारल्यास संपर्क साधावा'

कोणत्याही सेंटर ने रू. 800पेक्षा जास्त चाचणी शुल्क आकारल्यास या बाबतची माहिती तत्काळ जिल्हा सामान्य रूग्णालय कोरोना नियंत्रण कक्ष 07172-270669 या दुरध्वनी क्रमांकावर संपर्क साधून माहिती द्यावी. या सेंटरच्या इन्फ्लुएन्झा (ताप) सदृष लक्षणे असल्यास व अ‌ॅन्टीजन टेस्ट निगेटिव्ह आल्यास त्यांचे नमुने हे आर. टी. पी. सी. आर.साठी पाठविणे आनिवार्य असल्यामुळे खासगी अ‌ॅन्टीजन टेस्टिंग सेंटर असे नमुने शासकीय व्ही. डी. आर. एल. लॅब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे पाठवितात. या नमुन्यांकरीता शासनातर्फे कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येत नाही. तथापि काही खासगी अ‌ॅन्टीजन टेस्टिंग सेंटर हे आर. टी. पी. सी. आर. टेस्टसाठीही परस्पर अ‌ॅन्टीजन टेस्टिंगचे सेवाशुल्क रू. 800 घेतल्यावरही अतिरीक्त सेवाशुल्क आकारत आहेत. अशा प्रकारच्या घटना नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी याबाबत जिल्हा सामान्य रूग्णालय कोरोना नियंत्रण कक्षाशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी, असे आवाहन डॉ. राठोड यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details