महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ट्रक्टर-कारच्या धडकेत एक ठार दोन जखमी

ट्रॅक्टर आणि कारमध्ये झालेल्या जोरदार धडकेत एक मजूर जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री ब्रम्हपुरीपासून 3 किमी दूर असलेल्या खरबी टोल नाक्याजवळ घडली. एक मजुर व कार चालक जखमी झाले आहेत.

ट्रक्टर-कारच्या धडकेत एक ठार दोन जखमी

By

Published : Nov 19, 2019, 7:40 PM IST

चंद्रपूर -ट्रॅक्टर आणि कारमध्ये झालेल्या जोरदार धडकेत एक मजूर जागीच ठार झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना सोमवारी रात्री ब्रम्हपुरीपासून 3 किमी दूर असलेल्या खरबी टोल नाक्याजवळ घडली. एक मजुर व कार चालक जखमी झाले आहेत.

हेही वाचा - सरकारी बँकेतील ठेवींवरील विमा संरक्षण काढा; बँक कर्मचारी संघटनेची मागणी

प्रकाश बालाजी बगमारे (वय 45) हे आमगाव, तालुका वडसा यथील रहिवासी असून त्यांचा मृत्यू झाला. मुत्युकांचे नाव आहे. दुसरे मजूर रामभाऊ ढोरे गंभीर जखमी झाले आहेत. सोमवारी रात्री मारूती कार नागभिडच्या दिशेने जात होती. तर मजूर असलेला ट्रॅक्टर ब्रम्हपुरीकडे जात होते. खरबीटोल नाक्याजवळ धडक झाली. अपघातानंतर ट्रॅक्टर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून घटनेची माहिती ब्रम्हपुरी पोलीस स्टेशनला देण्यात आली आहे. घटनास्थळी ब्रम्हपुरी पोलीसांनी भेट दिली व पाहणी केली. पुढील तपास पोलीस करत आहेत.

हेही वाचा - मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षावर ३ अधिकाऱ्यांची नियुक्ती, मात्र काम अद्यापही ठप्प

ABOUT THE AUTHOR

...view details