महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या; आपचे धरणे आंदोलन - आम आदमी पक्षाचे धरणे आंदोलन चंद्रपूर

दिल्ली सरकारप्रमाणे हेक्टरी 50 हजार रुपये मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी, या मागणीसाठी आज(29 नोव्हेंबर) सावली तहसील कार्यालयात आम आदमी पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी, पक्षाच्या सदस्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदनदेखील देण्यात आले.

savli
सावलीत आम आदमी पक्षाचे धरणे आंदोलन

By

Published : Nov 29, 2019, 9:37 PM IST

चंद्रपूर - अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासन देत असलेली ८ हजार रुपये हेक्टर भरपाई अपुरी आणि शेतकऱ्यांचा अपमान करणारी आहे. त्यामुळे, दिल्ली सरकारप्रमाणे हेक्टरी 50 हजार रुपये मदत शेतकऱ्यांना देण्यात यावी, या मागणीसाठी आज (29 नोव्हेंबर) सावली तहसील कार्यालयात आम आदमी पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी, पक्षाच्या सदस्या अॅड. पारोमिता गोस्वामी यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदारांना निवेदनदेखील देण्यात आले.

सावलीत आम आदमी पक्षाचे धरणे आंदोलन

हेही वाचा -वंचितच्या नेतृत्त्वाखाली अकोल्यात शेतकरी आक्रोश मोर्चा; हेक्टरी 25 हजारांची मागणी

यावेळी बोलताना गोस्वामी म्हणाल्या, "जिल्ह्यात 1 लाख 85 हजार 30 शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे सरकारी आकडेवारी सांगते. आतापर्यंत 19 कोटी 45 लाख रुपयांची नुकसान भरपाई रक्कम मंजूर झाली आहे. प्रत्येक शेतकऱ्याला सरासरी 1051/- रुपये मंजूर होत आहेत. ही रक्कम देणे म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा आहे" यावेळी आम आदमी पक्षाचे पदाधिकारी आणि परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

ABOUT THE AUTHOR

...view details