महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अखेर विजपुरवठा सूरु; सिंचनाची समस्या सूटली - अखेर विजपुरवठा सूरु झाला

जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात येणाऱ्या नारंडा ते पिपरी रस्त्यावरील चंद्रभान तिखट यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मर महिण्याभरापासून बंद होते. त्या ठिकाणी नवीन ट्रान्सफॉर्मर बसवण्यात आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची सिंचनाची समस्या सूटणार आहे.

ट्रान्सफॉर्मर बसवताना

By

Published : Nov 25, 2019, 11:56 AM IST

चंद्रपूर - जिल्ह्यातील कोरपना तालुक्यात येणाऱ्या नारंडा ते पिपरी रस्त्यावरील चंद्रभान तिखट यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मर महिण्याभरापासून बंद होते. त्यामुळे शेतातील विहिरीवर लागलेल्या मोटारपंपाचा विज पुरवठा खंडित झाला होता. परिणामी रब्बी पिकांची पेरणी रखडली होती. यासाठी भाजयुमोने पाठपुरावा केला होता. अखेर महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने नवे ट्रान्सफॉर्मर बसवले.

माहिती देताना आशिष ताजने


कोरपना तालूक्यातील नारंडा येथील चंद्रभान तिखट यांच्या शेतातील ट्रान्सफॉर्मर महिनाभरापासून बंद होते. त्यामुळे शेतातील मोटारपंपाचा वीजपुरवठा खंडित झाला होता. परिणामी सिंचनाची समस्या उद्भवली. शेतातील सोयाबीन पिक निघाले आहे. आता चना व गहू पिकांचा पेरणीची तयारी शेतकरी करत आहेत. तर कपाशी पिकांना सिंचनाची गरज आहे. पंरतु, ट्रान्सफॉर्मर बंद असल्याने सिंचन रखडले होते. या समस्या शेतकऱ्यांनी भाजयुमोचे जिल्हा सचिव आशिष ताजने यांच्या लक्षात आणून दिली. अखेर भाजयूमोचा पुढाकारातून नवीन ट्रान्सफॉर्मर बसविण्यात आले.

हेही वाचा - कृषी विभागाकडून हरभऱ्याचे बियाणे मिळेना; संतप्त शेतकऱ्यांचा चिमूर कृषी कार्यालयात ठिय्या

ABOUT THE AUTHOR

...view details