चंद्रपूर : जापनीज इन्सेफेलायटीज (मेंदूज्वर) (Meningococcal Meningitis) या रोगामुळे दरवर्षी अनेक बालकांचा मृत्यू होतो. कोवळी बालके या आजाराला बळी पडतात. याची दखल घेत बालकांचे संरक्षण करण्यासाठी सरकारने मोहीम हाती घेतली आहे. या माध्यमातून 1 ते 15 वयोगटातील जिल्ह्यातील 4 लाख 32 हजार बालकांना लस देण्यात येणार आहे. या लसीकरण मोहिमेचा शुभारंभ ब्रम्हपुरी येथे पालकमंत्री विजय वडेट्टीवार (Vijay Vadettivar) यांच्या हस्ते करण्यात आले.
ब्रह्मपुरी येथे नेवाजाबाई हितकारिणी उच्च माध्यमिक विद्यालयात जॅपनीज इन्सेफेलायटिस या जिल्हास्तरीय लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा रिता ऊराडे, जि. प. सदस्य प्रमोद चिमुरकर, स्मिता पारधी, प्रभाकर सेलोकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.राजकुमार गहलोत, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. खिल्लारे उपस्थित होते.
डास चावल्याने मेंदूज्वर
धानाचे उत्पादन करताना निर्माण होणारे जे डास असतात ते चावल्याने मेंदुज्वर होण्याची शक्यता असते. विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे धान उत्पादक जिल्हे आहे. बालकांना मेंदुज्वर होणार नाही याची काळजी सरकारने घेतली असून सर्व पालकांनी आपल्या पाल्यांना लस द्यावी, असे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.
हेही वाचा -Bulli Bai App Case : मुंबई सायबर सेलने 21 वर्षीय विद्यार्थ्याला बंगळुरूमधून घेतले ताब्यात