चंद्रपूर - गडचांदूर जवळील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कॉलनीतील पोहण्यासाठी गेलेल्या ३ मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना आज घडली. सार्थक शशीकांत अल्हाट (वय-१२ वर्षे), मंजित विजय सिंग (वय-१४ वर्ष), शुभम दिवाकर गाजेरे (वय-१४) अशी मृतांची नावे आहेत. यापैकी शुभम हा नागपूर जिल्ह्यातील रामटेक येथील आहे.
चंद्रपुरात पोहण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू - Colony
गडचांदूर जवळील उपरवाही येथील अंबुजा सिमेंट कॉलनीतील पोहण्यासाठी गेलेल्या ३ मुलांचा नाल्यात बुडून मृत्यू झाला आहे. सार्थक शशीकांत अल्हाट (वय-१२ वर्षे), मंजित विजय सिंग (वय-१४ वर्ष), शुभम दिवाकर गाजेरे (वय-१४) अशी मृतांची नावे आहेत.
आज सकाळी अंदाजे ९.३० वाजताच्या दरम्यान सार्थक, मंजित, शुभम, अनुनय हे ४ ही मुले नाल्याकडे फिरायला गेले होते. अंबुजा सिमेंट लेबर कॉलनीच्या मागे असलेल्या मंगी नाल्यात सार्थक, मंजित, शुभम हे तिघेजण अंघोळीला गेले. परंतु सोबत असलेला अनुनय हा अंघोळीला गेला नाही. काही वेळाने अंघोळीला गेलेले त्यांचे मित्र बाहेर न आल्यामुळे अनुनयने अंबुज सिमेंट कॉलनीकडे धाव घेत घडलेली घटना सांगितली.
या घटनेची माहिती अंबुजा सिमेंट सुरक्षा अधिकारी विलास नारखेडे यांनी गडचांदूर पोलीस ठाण्याला कळविली. यादरम्यान गावकऱ्यांना याची माहिती मिळाली आणि त्यांनी या तिन्ही मुलांचे मृतदेह बाहेर काढले होते.
या घटनेतील शुभम गाजेरे हा युवक २२ तारखेला सुट्या घालविण्याकरता अंबुजा कॉलनी उप्परवाही येथे आला होता. या दुर्दैवी घटनेत चिमुकल्यांना जीव गमवावा लागला आहे. सध्या मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गडचांदूर ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले आहे. दरम्यान, या घटनेबाबत सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.