महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा धसका; रेड झोन जिल्ह्यातील 15 जण विनापरवाना चंद्रपूर जिल्ह्यात दाखल, नागरिकांमध्ये खळबळ

चंद्रपूर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नसल्याने हा जिल्हा ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र आता संचारबंदीतही चंद्रपूर जिल्ह्यात रेड झोन जिल्ह्यातील नागरिक आल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

Corona Virus
डॉ. परमेश्वर वाकडकर

By

Published : Apr 16, 2020, 1:53 PM IST

चंद्रपूर - कोरोनाचा एकही रुग्ण आढळला नसल्याने चंद्रपूर जिल्हा ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. मात्र घुग्घुस येथे 'रेड झोन' जिल्ह्यातील तब्बल 15 नागरिकांनी विनापरवाना प्रवेश केल्याने खळबळ उडाली आली आहे. यामुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. संपूर्ण देशात संचारबंदी असताना हे नागरिक विनापरवाना येथे कसे आले हा संशोधनाचा मुद्दा आहे. याबाबत येथील आरोग्य विभागाने जिल्हा प्रशासनाला माहिती दिली आहे.

माहिती देताना वैद्यकीय अधिकारी डॉ. परमेश्वर वाकडकर
कोरोना संसर्गाबाबत तीन झोन करण्यात आले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात एकही कोरोनाचा रुग्ण आढळला नसल्याने हा जिल्हा ग्रीन झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग जास्त असलेल्या म्हणजेच रेड आणि ऑरेंज जिल्ह्यातील लोकांना या जिल्ह्यात प्रवेशबंदी आहे. ज्यांना येणे अत्यावश्यक आहे, अशा नागरिकांना प्रशासनाकडून पास दिला जातो. असे असतानाही बुधवारी कोरोनाग्रस्त जिल्ह्यातून तब्बल 15 जण दाखल झाले. विशेष म्हणजे यापैकी कुठल्याही नागरिकांकडे हा पास नाही. यापैकी पुणे येथून 2, नागपूर 3, अहमदनगर 5, अमरावती 3, अकोला 2 आणि यवतमाळ येथून 1 व्यक्ती घुग्घुस येथे आलेले आहेत. त्यांच्या हातावर होम क्वारंटाईन असल्याचा शिक्का सुद्धा मारलेला नाही. ही बाब काही नागरिकांच्या लक्षात आल्यावर, त्यांनी ही बाब प्राथमिक आरोग्य केंद्राच्या लक्षात आणून दिली. यानंतर याची माहिती पोलीस विभाग आणि जिल्हा प्रशासनाला देण्यात आली. अशा प्रकारे नागरिकांचा प्रवेश होत राहिल्यास चंद्रपूर जिल्हा धोक्यात येऊ शकतो, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details