चंद्रपूर - जिल्ह्यात मागील 24 तासात 382 जणांनी कोरोनावर मात केली, त्यांना रुग्णालयातून सुट्टीची देण्यात आली. नवीन 1171 जणांना कोरोना झाला आहे. तर, 16 बाधितांचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत एकूण बाधितांची संख्या 37 हजार 919 वर पोहोचली आहे. तसेच सुरुवातीपासून आतापर्यंत बरे झालेल्यांची संख्या 29 हजार 162 झाली आहे. सध्या 8212 बाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत 3 लाख 16 हजार 119 नमुन्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 लाख 72 हजार 660 नमुने निगेटीव्ह आले आहेत.
आज (15 एप्रिल) मृत झालेल्यामध्ये चंद्रपूर शहरातील भिवापुर वॉर्ड येथील 63 वर्षीय महिला, दुर्गापूर येथील 62 वर्षीय महिला, घुटकाला येथील 60 वर्षीय पुरुष, जवाहरनगर वार्ड राजुरा येथील 57 वर्षीय महिला, चिमूर येथील 65 वर्षीय, 63 वर्षीय व 70 वर्षीय महिला, गोरेगाव जिल्हा गोंदिया येथील 60 वर्षीय महिला, वरोरा येथील 70 वर्षीय महिला, राजुरा येथील 39 वर्षीय पुरुष, बोरगाव, कोरपना येथील 62 वर्षीय महिला, गोवारी राजूरा येथील 65 वर्षीय पुरुष, मोरोशी, नागभिड येथील 74 वर्षीय पुरुष, सिंदेवाही येथील 53 वर्षीय पुरुष, यात्रा वार्ड वरोरा येथील 85 वर्षीय पुरुष व बल्लारपूर येथील 50 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.