चंद्रपूर- समोरून येणाऱ्या गाडीच्या हेडलाईटच्या तीव्र प्रकाशाने दुचाकी स्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे, दुचाकी समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळली. या घटनेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला. चिमूर भिसी पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या भिसी चौरस्त्यालगत असलेल्या दरगाहजवळ ही घटना घडली.
भिसी-उमरेड मार्गावर अपघात, एकाचा मृत्यू - road accident at chandrapur
समोरून येणाऱ्या गाडीच्या हेडलाईटच्या तीव्र प्रकाशाने दुचाकीस्वाराचे गाडीवरील नियंत्रण सुटले. यामुळे, दुचाकी समोरुन येणाऱ्या ट्रकवर आदळली. या घटनेत दुचाकीस्वार जागीच ठार झाला
भिसी उमरेड मार्गावर अपघात
सुधाकर इंगळे (वय ५५) असे या घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो भिवापूर तालुक्यातील वासी येथील रहिवासी आहे. सुधाकर इंगळे आपल्या सासुरवाडी पुयारदंड येथील सुरस्कार यांच्याकडे काही कामानिमित्त आले होते. यानंतर जवळच टाका या गावी काम आटोपून पुन्हा पुयारदंडला निघाले असताना हा अपघात घडला. या घटनेत डोक्याला जबर मार लागल्यामुळे सुधाकर इंगळे जागीच ठार झाले.