महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

राज ठाकरे यांनी कट-पेस्ट करुन लोकांची दिशाभूल करू नये-विनोद तावडे

काँग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळेत मुलींवर लैंगिक अत्याचार आणि लैंगिक शोषण होत आहे. अशा प्रकारच्या लोकांना निवडून देण्याचे आवाहन आपल्या जाहीर सभेत करणार आहात का? असेही तावडे म्हणाले.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची प्रतिक्रिया

By

Published : Apr 23, 2019, 3:09 PM IST

मुंबई- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कट-पेस्ट करुन लोकांची दिशाभूल करु नये, जे वास्तव आहे तेच मांडावे आणि नसेल जमत तर असे बोलू नये, अशी टीका शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी केली आहे. हरिसालचे वास्तव उपसरपंचांनी मांडल्यानंतर पत्रकारांनी यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नांवर तावडे यांनी राज ठाकरेंवर टीका केली.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची प्रतिक्रिया

काँग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळेत मुलींवर लैंगिक अत्याचार आणि लैंगिक शोषण होत आहे. याप्रकरणी पोलिसांनी केलेल्या कारवाई विरुध्द काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे आणि माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी लोक पैसे मिळविण्यासाठी असे आरोप करतात, असे म्हटले. आता आपल्याला राज ठाकरे यांना प्रश्न विचारायचा आहे, की मोदी आणि शहा नको, असे तुम्ही आवाहन करत असाल तर अशा प्रकारच्या लोकांना निवडून देण्याचे आवाहन आपल्या जाहीर सभेत करणार आहात का? की अशा लोकांवर टीका करणार, याचे उत्तर त्यांनी जनतेला द्यावे, असेही तावडे म्हणाले.


१९७५ साली जेव्हा देशात आणीबाणी लागू झाली, तेव्हाच देशाच्या संविधानावर घाला घातला होता, त्यावेळी शरद पवार आपण त्याच पक्षात होतात हे बहुधा आपल्याला आठवत नसावे, असा टोला विनोद तावडे यांनी शरद पवारांना मारला. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी जो आदर्श घोटाळा केला त्यामुळे महाराष्ट्राची नाचक्की झाली. ती नाचक्की कधीही पुसुन काढता येणार नाही. अशी टीका तावडे यांनी चव्हाण यांच्यावर केली.

काँग्रेसवाल्यांना अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर बोलण्याचा काहीच अधिकार नाही. व्यासपीठावर आलेल्या तरुणाने आपल्या मनातील भावना व्यक्त केली तर काँग्रेसवाल्यांना राग का आला. दिग्विजय सिंह यांच्यासारख्या नेत्यांच्या सभेत त्या तरुणाने आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या, तर त्या तरुणाला जे मनापासून पटले ते त्यांनी बोलून दाखविण्याची हिंमत दाखविली. त्या तरुणाचे बोलणे खोटे असेल तर दिग्विजय सिंह यांनी आपल्या भाषणातून खोडून काढायला हवे होते, असे टीकाही विनोद तावडे यांनी काँग्रेसवर केली.

ABOUT THE AUTHOR

...view details