मुंबई - सभागृहात आज विधानसभा विरोधी पक्षनेतेपदी विजय वड्डेटीवार यांची निवड झाली. काँग्रेसचे नेते, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, बविआ व इतर पक्ष यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल नवनिर्वाचित विरोधी पक्षनेते विजय वड्डेटीवार यांनी आभार मानले. सभागृह सुरू झाल्यापासून गेले काही आठवडाभर हे पद रिक्त होते. अखेर माझी निवड झाली, पुढील संपूर्ण आठवडा खूप काम आहे. अधिवेशनाचा कालावधी कमी असून निवडणूकाही तोंडावर आल्या आहेत. ही आव्हान असून 20- 20 मॅच सारख काम करावं लागेल अशी प्रतिक्रिया वड्डेटीवार यांनी व्यक्त केली.
माझा पक्ष सत्तेत आल्याशिवाय मी स्वस्थ राहणार नाही. महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेचा या सरकारच्या विरोधात आक्रोश आहे. राज्यात शेतकऱ्यांचे प्रश्न,बेरोजगारी वाढत आहे. 1100 जागांसाठी 14 लाख लोकांनी अर्ज केले आहेत.