मुंबई- लोकसभा निवडणुक २०१९ चा निकाल जाहीर होण्यासाठी अवघे ३ दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे निकालाबाबत सर्वच उमेदवारांची धाकधूक वाढली आहे. याच पार्श्वभूमीवर बोलताना उत्तर मुंबईचे विद्यमान भाजप खासदार आणि उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी २३ तारखेला पुन्हा एकदा उत्तर मुंबईची शान मुंबईसह महाराष्ट्रात पाहायला मिळणार आहे, असा विश्वास व्यक्त केला.
उत्तर मुंबईची शान मुंबईसह महाराष्ट्रात पुन्हा पहायला मिळेल, गोपाळ शेट्टींचा दावा - गोपाळ शेट्टी
मालाड आणि बोरिवली विधानसभेतूनच सर्वांत जास्त मतांची आघाडी भाजपच्या पदरी पडेल. २०१४ चा रेकॉर्डब्रेक करुन ५ लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार, असा विश्वास गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केला.
गोपाळ शेट्टी
गोपाळ शेट्टी म्हणाले, उत्तर मुंबईतील बोरिवली विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मतदान झाले आहे. मालाड आणि बोरिवली विधानसभेतूनच सर्वांत जास्त मतांची आघाडी भाजपच्या पदरी पडेल. २०१४ चा रेकॉर्डब्रेक करुन ५ लाखांच्या मताधिक्याने विजयी होणार. २३ तारखेला निकाला दिवशी सकाळी १० ते ११ वाजेपर्यंत चित्र स्पष्ट होईल.
गोपाळ शेट्टी २०१४ ला मुंबईत ४ लाख ४५ हजार मतांची सर्वाधिक आघाडी घेऊन विजयी झाले होते. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार संजय निरुपम यांचा पराभव केला होता.