मुंबई- नामांकित कॉस्मेटिक कंपनीची कोट्यवधी रूपयांची फसवणूक करुन कंपनीची उत्पादने बाहेर कमी किंमतीत विकणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांच्या आर.ए.के मार्ग पोलिसांनी छडा लावला आहे. गेल्या काही महिन्यात अटक झालेल्या आरोपींनी फसवणूक करुन कोटींमध्ये पैसे कमावल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
नामांकित कॉस्मेटीक कंपनीची कोट्यवधींची फसवणूक, २ आरोपींना अटक
बेला कंपनीचा माल तुम्ही परत करा आणि रिसिव्ह कॉपी द्या, असे केल्यास ग्राहकांना त्याच्या मोबदल्यात फॉरेन टूरचे आमिष दिले जायचे.
निलेश दुबे आणि रुणीत शहा अशी अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. दोघेजण बेला कंपनीत सेल्समन पदावर काम करत होते. कॉस्मेटिक उत्पादनाच्या ग्राहकांना हे दोघे सांगायचे की, बेला कंपनीचा माल तुम्ही परत करा आणि रिसिव्ह कॉपी द्या, असे केल्यास ग्राहकांना त्याच्या मोबदल्यात फॉरेन टूरचे आमिष दिले जायचे. ग्राहकांकडून परत घेतलेला माल ते कंपनीला परत न देता परस्पर लालजी गुप्ता आणि अन्वर खान या दोघांना विकत होते.
पोलीस तापासत आतापर्यंत या टोळीने १ कोटी १० हजार रुपयांची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. मात्र, या गुन्ह्यात आणखीन काहीजण अडकले असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू आहे.