मुंबई -भांडूप तलावासमोर पूर्व द्रुतगती महामार्गावर रात्री 8 वाजता बीएमसीचा कचरा वाहतूक करणारा ट्रक उलटला. त्यामुळे या महामार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. वाहतूक विभाग व पोलिसांनी अडवा असलेला ट्रक रस्त्याच्या एका बाजूला करत वाहतूक सुरळीत केली.
भांडूपमध्ये कचऱ्याचा ट्रक उलटलेल्या मार्गावरील वाहतूक सुरळीत चालू - East speed highway
भांडूप तलावासमोर पूर्व द्रुतगती महामार्गावर रात्री 8 वाजता बीएमसीचा कचरा वाहतूक करणारा ट्रक उलटला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
भांडूपमध्ये कचऱ्याचा ट्रक उलटलेल्या मार्गावरून वाहतूक सुरळीत चालू
पूर्व द्रुतगती मार्गावर भांडूप तलावासमोर पालिकेचा कचरा घेऊन बीएमसीचा कचरा वाहतूक करणारा ट्रक जात होता. ठाण्याच्या दिशेने वेगाने जात असताना अचानक चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झाले. या ठिकाणी हा उलटलेला ट्रक बाजूला काढला. मुंबईत अगोदरच अनेक ठिकाणी पूल बंद करण्यात आल्याने वाहतूक कोंडी होत आहे. त्यात हा ट्रक उलटल्याने आणखी भर पडली होती.