महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सोनिया-राज भेटीवर मुनगंटीवारांची टीका; म्हणाले, हरलेले नेते एकत्र आल्यानंतर हरण्याचे दुःख होते कमी - visit

सोनिया गांधी आणि राज ठाकरेंच्या भेटीवर अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी टीका केली आहे.

सुधीर मुनगंटीवार

By

Published : Jul 9, 2019, 7:51 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नेहमीच काँग्रेसला बाहेरुन मदत केली. आता ते प्रत्यक्ष मदत करतील. मात्र, यात दोघांचे नुकसान होईल. २ हरलेले नेते एकत्र आले तर हरण्याचे दुःख कमी होते, असे म्हणत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सोनिया गांधी आणि राज ठाकरेंच्या भेटीवर टीका केली.

सुधीर मुनगंटीवार

देशात आणि राज्यात काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. निवडणुकीत पराभवामुळे काँग्रेस आता मनाने हरत आहे. यश-अपयशाला न घाबरता जनतेची सेवा करायची, असे अटलजींनी सांगितले. त्यामुळे निवडणुकीत हरले तर जिंकता येते. मात्र, काँग्रेसला सत्तेच्या विरहामुळे हे कळेनासे झाले आहे, असे म्हणत मुनगंटीवार यांनी काँग्रेस जिवंत रहावी, असा उपरोधिक टोला लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details