मुंबई - नेहमी शनिवारी-रविवारी ब्लॉक घेणाऱ्या रेल्वेने आज अचानक ब्लॉक घेतला. यामुळे हार्बर मार्गावर वडाळा ते सेवरीदरम्यान लोकल सेवा विस्कळीत झाली.
रेल्वेचा वडाळा ते सेवरीदरम्यान अचानक ब्लॉक, भरदुपारी प्रवाशांचे हाल - wadala
अचानक घेण्यात आलेल्या या ब्लॉकमुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल २५ मिनिटे उशिराने धावत होत्या
हार्बर मार्गावर वडाळा ते सेवरी दरम्यान आज दुपारी अचानक ब्लॉक घेण्यात आला. त्यामुळे पनवेलहून सीएसएमटीकडे जाणारी लोकल सेवा खोळंबली. यामुळे ऐन दुपारी प्रवाशांचे प्रचंड हाल झाले.
काही स्थानकांवर काही लोकल सेवा रद्द करण्यात आल्याच्या रेल्वे विभागाकडून उद्घोषणाही करण्यात आल्या आहेत. अचानक घेण्यात आलेल्या या ब्लॉकमुळे सीएसएमटीकडे जाणाऱ्या लोकल २५ मिनिटे उशिराने धावत होत्या. परिणामी प्रवाशांनी कुर्ला येथे उतरून मध्य रेल्वेने सीएसएमटी स्थानक गाठले. आज दुपारी १२.२५ ते १२.५५ पर्यंत तत्काळ ब्लॉक घेण्यात आला. रद्द करण्यात आलेल्या लोकलची सेवा पूर्ववत सुरू करण्यात आल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.