मुंबई - महसुलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर केलेली टीका ही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सीएसटी परिसरात चंद्रकांत पाटील यांचा फोटो दाखवताना तुम्ही यांना ओळखता का? चंद्रकांत पाटील यांना ओळखा आणि पैसे कमवा, अशी मोहीम उघडली आहे.
चंद्रकांत पाटलांना तुम्ही ओळखता का? राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सीएसएमटी परिसरात मोहीम - सीएसएमटी
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सीएसटी परिसरात चंद्रकांत पाटील यांचा फोटो दाखवताना तुम्ही यांना ओळखता का? चंद्रकांत पाटील यांना ओळखा आणि पैसे कमवा, अशी मोहीम उघडली आहे.
चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबाबत बोलताना त्यांची राजकीय कारकिर्द संपवून टाकू, अशी टीका केली होती. शरद पवारांविरोधात असे विधान केल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी तुम्ही चंद्रकांत पाटील यांना ओळखता का? अशी मोहीम उघडली आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पाटील यांचा फोटो दाखवत जनतेला प्रश्न विचारले.
चंद्रकांत पाटील यांना कोण ओळखेल त्याला आम्ही १०१ रुपये देवू, असे प्रश्न राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विचारले. या मोहिमेत १० लोकांपैकी एकानेही चंद्रकांत पाटील यांना ओळखले नाही. १० पैकी एकहीजण चंद्रकांत पाटील यांना ओळखू शकले नाही. त्यामुळे त्यांची किंमत काय आहे हे दाखवून दिले आहे, असे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.