मुंबई - मोनो, लोकल, मेट्रो, बेस्टसह वॉटर ट्रान्सपोर्ट हे मुंबईतील वाहतुकीची सर्व माध्यमे एकाच डिजिटल माध्यमावर आणण्यात येणार आहे. यासाठी इंटिग्रेटेड तिकिट सिस्टम सुरू करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
मुंबईतील ट्रान्सपोर्ट होणार इंटिग्रेटेड तिकिट फ्लॅटफॉर्मवर - मुख्यमंत्री
मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याचे काम पाहून पियुष गोयल यांनी मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले.
शहरातील महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून पाहिल्या जाणाऱ्या मोनो रेल्वेच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. मुंबईतील वाहतुकीची समस्या मुख्यमंत्र्यांनी ओळखून केवळ जॉय राईड म्हणून मोनोच्या पहिल्या टप्प्याला पाहिले जात होते. मात्र, दुसऱ्या टप्प्याचे काम मुख्यमंत्र्यांनी सर्व प्रश्न सोडवून पूर्ण केल्याबद्दल पियुष गोयल यांनी समाधान व्यक्त केले.
रेल्वे निर्मितीनंतर २०१४ पर्यंत जेवढे काम झाले नाही, त्याहून अधिक काम २०१४ पासून ते आतापर्यंत झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले. मोनोचा पूर्ण टप्पा सुरू केल्याने आता महिन्याला ३० लाख प्रवासी याचा लाभ घेणार आहेत.