मुंबई - बेस्टमध्ये नोकरीतून निवृत्त झालो. २०१६ पासून आतापर्यंत मला आणि माझ्यासारख्या अनेक कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी, रजेचे पैसे मिळालेली नाही, ती मिळवून देण्यासाठी मी मैदानात उभा आहे, असा अजब दावा उत्तर-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार अंकुश कारंडे यांनी केला.
ग्रॅज्युटी मिळाली नाही म्हणून निवडणुकीसाठी मैदानात उतरलो - अपक्ष उमेदवार अंकुश कारंडे
बेस्ट शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांनी उद्ध्वस्त केली आहे. बेस्टचा मुद्दा मुंबईतील असला तरी मला केंद्रात जावून तो विषय सोडवायचा आहे.
बेस्टमध्ये निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणी पाहत नाही, आज बेस्ट शिवसेना आणि त्यांच्या नेत्यांनी उद्ध्वस्त केली आहे. माझ्यासारख्या निवृत्त झालेल्या आणि केवळ आठवी पास झालेल्या उमेदवाराला उभे राहावे लागत आहे. बेस्टचा मुद्दा मुंबईतील असला तरी मला केंद्रात जावून तो विषय सोडवायचा आहे. त्यासाठी माझ्यामागे उत्तर-मध्य लोकसभा मतदारसंघातील बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा पाठिंबा असल्याचे कारंडे म्हणाले.
अंकुश कारंडे कुर्ला स्थानकाबाहेर मोठा मुलगा आणि बेस्टमधील काही कर्मचाऱ्यांसह पत्रक वाटत प्रचार करत आहेत. बेस्टसाठी मी उभा असून तुम्ही मला मतदान करावे, असे आवाहन ते मतदारांना करत आहेत.