दुष्काळामुळे मोडावे लागले पोरीचे लग्न; बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांची व्यथा
बीड- सातत्याने पडणाऱ्या दुष्काळाने आमच्या चेहऱ्यावरचं हसू हिरावून घेतलंय. घरची पाच एकर जमीन असूनही मोलमजुरी करून जगावं लागतंय. मागील दोन वर्षांपासून शेतीतून एक नवा पैसा देखील उत्पन्न मिळाले नाही. एवढेच काय तर दीड- दोन वर्षांपूर्वी मुलीचं लग्न जमलं होतं, मात्र खिशात पैसा नव्हता म्हणून काळजावर दगड ठेवून पोरीचं लग्न मोडावं लागलं.वाचा सविस्तर...
नगरमधील घटना ऑनर किलिंग नाही? आरोपींना प्रकरणातून वगळण्यासाठी पोलिसांचा न्यायालयात अर्ज
अहमदनगर- निघोज येथील जळीत कांड हे पोलीस तपासात ऑनर किलिंग नसल्याचे पुढे आले आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या मृत रुक्मिणीचे वडील, चुलते आणि मामा यांचा जळीत प्रकरणाशी संबंध नाही, असे पोलिसांनी न्यायालयात अर्जाद्वारे सांगितले आहे. वाचा सविस्तर...
सॅम पित्रोदांनी 'त्या' वक्तव्याबद्दल माफी मागावी - राहुल गांधी
पंजाब - सॅम पित्रोदा यांनी १९८४ च्या शीख दंगलीबद्दल केलेले वक्तव्य योग्य नाही. त्यामुळे त्यांनी माफी मागायला हवी, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. वाचा सविस्तर...