मुंबई - शहरातील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी एक असलेल्या मोनो रेल्वेचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात वडाळा ते संत गाडगे महाराज चौक दरम्यान ही मोनो रेल्वे धावेल.
मोनोच्या दुसऱ्या टप्यात सेवा सुरू - sant gadge baba
सेवा सुरू झाल्यानंतर प्रत्येकी २२ मिनिटांच्या कालावधीने प्रवाशांना गाडी उपलब्ध होईल. ४ डब्यांच्या गाडीत एकूण ५६७ प्रवासी प्रवास करू शकतील.
वडाळा ते संत गाडगे महाराज चौक (सात रस्ता) हा टप्पा सुरू झाल्यानंतर संपूर्ण मार्गिकेवर १ लाख प्रवासी संख्या अपेक्षित आहे. या दुसऱ्या टप्प्यामुळे चेंबूर ते संत गाडगे महाराज चौक हे अंतर अवघ्या ३० मिनिटांत पार होईल. काही महिने एकूण ६ गाड्यांच्या बळावर संपूर्ण १९ किमीच्या मार्गिकेवरील वाहतूक सुरू राहील. त्यानंतर टप्याटप्याने यामध्ये अतिरिक्त मोनो गाड्यांची भर पडेल.