मुंबई - हार्बर रेल्वे स्थानकावर मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारे आणि अत्यंत गजबजलेल्या स्थानक म्हणून मानखुर्द स्थानकाची ओळख आहे. या स्थानकावरून ये-जा करणाऱ्या प्रवाशांना रविवारच्या मेगाब्लॉकची माहिती देण्यासाठी हे स्थानक मागील अनेक वर्षांपासून एक आगळी वेगळी परंपरा जपत आहे. स्थानकाच्या फलाट क्रमांक १वर 'स्टेशन मास्टर'चे कार्यालय आहे. याच कार्यालयाच्या समोरून प्रवाशांना ये-जा करावी लागते.
प्रवाशांच्या सेवेसाठी मानखुर्द स्थानकाची आगळी वेगळी परंपरा; बोर्ड पाहून प्रवाशांना मिळतो दिलासा - हार्बर रेल्वे
स्थानकातून रविवारी ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना मेगा ब्लॉकमुळे अडचणींनीना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये. यासाठी प्रत्येक शनिवारी सायंकाळी येथे एक मोठा फलक लावण्यात येतो. हा फलक येथील प्रवाशांना एक मोठ्या गाईडसारखे काम करत असतो. यावर हार्बर मार्गावर कोणत्या ठिकाणी मेगा ब्लॉक आहे, आणि कुठे गाड्या किती वाजता चालतील आणि कुठे बंद असतील, याची माहिती लिहिलेली असते.
स्थानकातून रविवारी ये-जा करणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांना मेगा ब्लॉकमुळे अडचणींनीना सामोरे जाण्याची वेळ येऊ नये. यासाठी प्रत्येक शनिवारी सायंकाळी येथे एक मोठा फलक लावण्यात येतो. हा फलक येथील प्रवाशांना एक मोठ्या गाईडसारखे काम करत असतो. यावर हार्बर मार्गावर कोणत्या ठिकाणी मेगा ब्लॉक आहे, आणि कुठे गाड्या किती वाजता चालतील आणि कुठे बंद असतील, याची माहिती लिहिलेली असते. ही माहिती मानखुर्द आणि आजुबाजूहुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठी फायद्याची ठरत असून येथून ये-जा करताना प्रवाशी थांबून त्यासाठीची माहिती वाचत असतात.
मागील दहा वर्षांहून अधिक काळ अगदी न चुकता ही माहिती येथे लिहिली जात असल्याचे येथे सांगण्यात येते. या भागात अनेक प्रवासी हे गोरगरीब वस्तीत राहतात, अनेकांना मेगा ब्लॉक किती वाजता आणि कुठे आहे, याची माहिती नसते. त्यामुळे आमच्याकडून लिहिण्यात आलेल्या बोर्डचे वाचन बहुतांश प्रवाशी करत असून त्यामुळे त्यांना रविवारच्या वेळेचे नियोजन करण्यास मोठी मदत होत असल्याचे एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.