महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विद्याविहार रेल्वे स्थानकातील रुळावर पाणी; लोकल सेवा उशिराने

मुसळधार पावसाने मध्य रेल्वेच्या विद्याविहार रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 आणि 2 पाण्याखाली गेले आहेत. रुळावर पाणी भरल्याने लोकल उशिराने धावत आहेत.

विद्याविहार रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 1 व 2 रुळावर पाणी भरले आहे

By

Published : Jul 8, 2019, 2:07 PM IST

मुंबई- आज सकाळ पासून मुंबईत पुन्हा एकदा पावसाने जोर धरला असून सखल भागात पाणी भरायला सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसाने मध्य रेल्वेच्या विद्याविहार रेल्वे स्थानकावरील फलाट क्रमांक 1 आणि 2 पाण्याखाली गेले आहेत. रेल्वे रुळावरही पाणी भरल्याने लोकल उशिराने धावत आहेत.

विद्याविहार रेल्वे स्थानक फलाट क्रमांक 1 व 2 रुळावर पाणी भरले आहे
सखल भागात पाणी भरत असल्याचा फटका मध्य रेल्वेला बसला आहे. विद्याविहार रेल्वे स्थानक व काही ठिकाणी कुर्ला दिशेने पाणी भरल्याचे पाहायला मिळालेले आहे. यामुळे अप आणि डाऊन मार्गावरील धीम्या लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने धावत आहेत. पावसामुळे ठिकठिकाणी पाणी साचले असून यामुळे नागरिकांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details