मुंबई- पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेनेचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या संदर्भातील खटल्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल बुधवारी येणे अपेक्षित आहे. यावेळी कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानच्या तुरुंगातून नक्की सुटका होईल, असा विश्वास त्यांच्या मित्रांनी व्यक्त केला आहे.
कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानच्या तुरुंगातून सुटका होईल; मित्रांनी व्यक्त केला विश्वास - friend
पाकिस्तानच्या अटकेत असलेले भारतीय नौसेनेचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांच्या संदर्भातील खटल्याचा आंतरराष्ट्रीय न्यायालयाचा निकाल आज येणे अपेक्षित आहे.
ना. म. जोशी पोलीस ठाण्याच्या परिसरात जाधव यांचे कुटुंब वास्तव्याला होते. याठिकाणी जाधव यांचे कुटुंब सध्या राहत नाही. मात्र, जवळच्या पृथ्वी नंदन सोसायटीत जाधव यांचा मित्र परिवार राहतो. आजच्या खटल्याच्या पार्श्वभूमीवर आमचे प्रतिनिधी सचिन गडहिरे यांनी जाधव यांच्या मित्रांशी संवाद साधला.
कुलभूषण जाधव यांच्यावर पाकिस्तानने केलेला आरोप निराधार आहे. त्यामुळे जाधव यांची आज नक्की सुटका होईल, असा आम्हाला विश्वास आहे, अशी भावना जाधव कुटुंबाच्या शेजारी राहिलेल्या पवार यांनी व्यक्त केली. पवार यांनी कुलभूषण जाधव यांच्याविषयीचा एक किस्साही शेअर केला. रस्त्यावर राहणाऱ्या एका वृद्ध आजारी महिलेला जाधव यांनी रात्री रुग्णालयात नेले होते. अशा दयाळू माणसासोबत कधीच वाईट होणार नाही, अशी प्रतिक्रिया पवार यांनी दिली.