महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बाळासाहेब ठाकरे यांना राष्ट्र पुरुषाचा दर्जा द्या, शिवसेना नगरसेवकाची मागणी - Nation Men's Status

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना राष्ट्रपुरुषाचा दर्जा द्यावा यासाठी शिवसेनेचे नगरसेवक किरण लांडगे यांनी पालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडली.

बाळासाहेब ठाकरे

By

Published : Jul 22, 2019, 7:55 AM IST

मुंबई- शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, पुण्यतिथी शासकीय स्तरावर साजरी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. त्यासाठी राष्ट्रीय पुरुष, थोर नेत्यांची जयंती, पुण्यतिथीबाबत राज्य सरकारने जारी केलेल्या परिपत्रकात बाळासाहेब ठाकरे यांचेही नाव समाविष्ट करण्यात यावे यासाठी शिवसेनेचे नगरसेवक किरण लांडगे यांनी पालिका सभागृहात ठरावाची सूचना मांडली आहे.

बाळासाहेब ठाकरे यांच्या ४६ वर्षांच्या राजकीय कारकीर्दीत त्यांनी अनेक राजकीय नेते घडविले. विरोधी पक्षांमध्येही त्यांच्याबद्दल आदर आहे. निवडणूक न लढविता त्यांनी राजकारणावर अधिराज्य गाजविले. राज्य सरकारने राष्ट्रीय पुरुष, थोर नेत्यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करण्याबाबत नोव्हेंबर २०१५ रोजी परिपत्रक जारी केले आहे. या परिपत्रकात बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. परिपत्रकातील यादीत ठाकरे यांच्या नावाचा समावेश करावा आणि शासन पातळीवर त्यांची जयंती आणि पुण्यतिथी साजरी करावी, अशी मागणी नगरसेवक किरण लांडगे यांनी केली आहे.

भावी पिढीला बाळासाहेब ठाकरे यांची महती कळावी यासाठी शासकीय पातळीवर बाळासाहेब ठाकरे यांची जयंती, पुण्यतिथी साजरी करणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेत राज्य सरकारच्या राष्ट्रीय पुरुष, थोर नेत्यांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करण्याच्या यादीत सुधारणा करावी आणि शिवसेनाप्रमुखांचे नाव त्यात समाविष्ट करावे, अशा आशयाच्या ठरावाची सूचना लांडगे यांनी पालिका सभागृहात मांडली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details