महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

तीन कोटींचे विदेशी चलन टॅक्सीतून जप्त, निवडणूक विभागाच्या पथकाची कारवाई - Loksabha poll

निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांकडून मतदारांना पैसे व दारुचे प्रलोभन दाखविण्याची भीती असते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाच्या दक्षता पथकाकडून वाहनांची तपासणी केली जात आहे.

प्रतिकात्मक

By

Published : Apr 12, 2019, 12:42 AM IST

मुंबई- निवडणूक आयोगाच्या पथकाने मुंबईतील वाहनांच्या तपासणीदरम्यान मोठी कारवाई केली आहे. पथकाने काळी-पिवळी टॅक्सीमधून प्रवास करणाऱ्या दोघांकडे विविध देशांचे चलन जप्त केले आहे. त्याची भारतीय मुल्यात तीन कोटी रुपये एवढी किंमत आहे.

जप्त करण्यात आलेले चलन कशासाठी आणले होते व कुठे नेले जात होते, याचा तपास निवडणूक आयोगाचे पथक करत आहे. निवडणुकीदरम्यान राजकीय पक्षांकडून मतदारांना पैसे व दारुचे प्रलोभन दाखविण्याची भीती असते. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी निवडणूक आयोगाच्या दक्षता पथकाकडून वाहनांची तपासणी केली जात आहे.

निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात २ हजार ६२६ कोटी रुपये जप्त-

लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा आज पार पडला. निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडत असतानाच संध्याकाळी ६ वाजेपर्यंत २ हजार ६२६ कोटी रुपये जप्त करण्यात आले असल्याचे निवडणूक आयोगाने सांगितले आहे. पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाने ही माहिती दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details