महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डॉ. पायल तडवीच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा द्या; नायर रुग्णालयाबाहेर निदर्शने - raging

पायल तडवी (वय २३) या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेत आत्महत्या केली होती. नायर रुग्णालयातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्येचा निर्णय घेतला होता.

नायर रुग्णालयाबाहेर निदर्शने

By

Published : May 25, 2019, 4:40 PM IST

मुंबई- वरिष्ठ विद्यार्थिनींकडून होणाऱ्या जातीवाचक रॅगिंगला कंटाळून जळगावच्या विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना मुंबईच्या नायर रुग्णालयाच्या वसतिगृहात घडली. राष्ट्रीय अत्याचार निवारण शक्ती आणि भारतीय मोर्चा या संघटनांनी दोषींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी करत निदर्शने केली.

नायर रुग्णालयाबाहेर निदर्शने

पायल तडवी (वय २३) या विद्यार्थिनीने वसतिगृहात गळफास घेत आत्महत्या केली होती. नायर रुग्णालयातील डॉ. हेमा आहुजा, डॉ. भक्ती मेहरे आणि डॉ. अंकिता खंडेलवाल यांच्या छळाला कंटाळून तिने आत्महत्येचा निर्णय घेतला. डॉ. पायल तडवी हिच्या आत्महत्येला जबाबदार असणाऱ्या तिघींवर त्वरीत कारवाई करावी. दोषी विद्यार्थींनी सवर्ण जातीतील असल्याने रुग्णालय आणि पोलीस प्रशासन त्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. नायर रुग्णालयाचा प्रशासनाला पायलच्या आईने पत्र देऊनही रुग्णालय प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते. दोषी विद्यार्थींनीचे पदव्युत्तर अभ्यासक्रमाचा प्रवेश रद्द करावा. त्यांचे पुढील शिक्षण स्थगित करावे. त्यांची एमबीबीएसची पदवी काढून घ्यावी, अशी मागणी पायलच्या कुटुंबीयांनी केली आहे.


घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. पाययला न्याय मिळावा म्हणून काही संघटनांनी नायर रुग्णालयाबाहेर निदर्शने केली. या तिन्ही डॉक्टरांवर कारवाई करुन डॉ. पायल तडवी यांना न्याय द्यावा, अन्यथा भारतभर आंदोलन करण्याचा इशारा भारतीय विद्यार्थी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष राकेश गायकवाड यांनी दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details