महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईतील लोकलमध्ये गेल्या ६ वर्षात ८ कोटींची चैन स्नॅचिंग - मुंबई

पोलिसांनी फक्त ३ कोटी ३२ लाख ३९ हजार ९२१ रुपये इतक्या किंमतीची मालमत्ता परत मिळविली आहे. पोलिसांकडून केवळ ४० टक्के चोरीच्या प्रकरणात तपास झाला आहे, अशी बाब समोर येत आहे.

मुंबई लोकल

By

Published : Apr 27, 2019, 2:28 PM IST

मुंबई- लोकल रेल्वे स्थानकांवर सुरक्षिततेच्या दृष्टीने रेल्वेने कोट्यवधी रुपये खर्च करुन प्रत्येक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमरे लावले आहेत. तरीसुद्धा चैन स्नॅचिंग सारख्या गुन्ह्यात कोणत्याही प्रकारची घट झालेली दिसून आली नाही.

मुंबई लोकल

आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी आरटीआयचा वापर करत ही बाब समोर आणली आहे. सन २०१५ नंतर आतापर्यंत चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यात लक्षणीय वाढ झाली आहे. आरटीआयच्या माहितीप्रमाणे मुंबईत १ जानेवरी २०१३ पासून डिसेंबर २०१८ पर्यंत एकूण २०८४ चैन स्नेचिंग आणि जबरी चैन स्नॅचिंगच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. गेल्या ६ वर्षात ८ कोटी २८ लाख २४ हजार ३९९ रुपये किंमतीची मालमत्तेची चोरी झाली आहे. यात फक्त ८६० गुन्ह्यांचा तपास लागला आहे. पोलिसांनी फक्त ३ कोटी ३२ लाख ३९ हजार ९२१ रुपये इतक्या किंमतीची मालमत्ता परत मिळविली आहे. पोलिसांकडून केवळ ४० टक्के चोरीच्या प्रकरणात तपास झाला आहे, अशी बाब समोर येत आहे.

आरटीआय माहिती
आरटीआय माहिती

२०१३ मध्ये एकूण ६२ चैन स्नेचिंग घटना, २० लाख ३७ हजार रुपयांचे सोने चोरी
२०१४ मध्ये एकूण ७३ चैन स्नेचिंग घटना, २३ लाख ६७ हजार रुपयांचे सोने चोरी
२०१५ मध्ये एकूण २४४ चैन स्नेचिंग चोरी घटना, ८६ लाख ९२ हजार रुपयांचे सोने चोरी
२०१६ मध्ये एकूण ३०९ चैन स्नेचिंग घटना, १ कोटी २० लाख ५३ हजार रुपयांचे सोने चोरी
२०१७ मध्ये एकूण ३४१ चैन स्नेचिंग घटना, १ कोटी ४२ लाख ९२ हजार रुपयांचे सोने चोरी
२०१८ मध्ये एकूण ३१४ चैन स्नेचिंग घटना, १ कोटी ४९ लाख २७ हजार रुपयांचे सोने चोरी

ABOUT THE AUTHOR

...view details