मुंबई - किनारी भागावरील चक्रीवादळाचा धोका टळला आहे. चक्रीवादळ गुजरातकडे सरकले आहे, तरी खबरदारी म्हणून मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हाय अलर्ट देण्यात आले आहेत. काल मुंबईत पडलेल्या पावसामुळे मुंबईकर काही काळ सुखावला होता. पण या सरी मान्सूनपूर्व सरी नसून वळवाचा पाऊस होता. महाराष्ट्रात पाऊस दाखल होण्यासाठी अजून 8 ते 10 दहा दिवसांचा कालावधी लागेल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्रावरचा चक्रीवादळाचा धोका टळला; राज्यात पाऊस दाखल होण्यासाठी आणखी दहा दिवस
महाराष्ट्राला असलेला चक्रीवादळाचा धोका तूर्तास टळला असला तरी गुजरातसह इतर राज्यांना मात्र धोका कायम आहे. महाराष्ट्रात पाऊस दाखल होण्यासाठी अजून 8 ते 10 दहा दिवसांचा कालावधी लागेल असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.
केरळमध्ये दाखल झालेला मान्सून आता पुढील काही दिवसांमध्ये देशात देखील सक्रीय होण्याची चिन्ह आहेत. पण, सध्या वायू चक्रीवादळाचा धोका कायम आहे. महाराष्ट्राला असलेला धोका तूर्तास टळला असला तरी गुजरातसह इतर राज्यांना मात्र धोका कायम आहे. हवामान विभागानं गुजरात, तामिळनाडू, केरळ, कर्नाटक या राज्यांमध्ये जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवली आहे. किनारी भागांना जास्त धोका आहे. पुढील 48 तासामध्ये वायू चक्रीवादळाचा धोका कायम असून मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्याचबरोबर जे मच्छिमार समुद्रात आहे त्यांनी परत यावे असे आवाहन आम्ही केले आहे,अशी माहिती मुंबई हवामान विभागाचे उपमहासंचालक के एस होसाळीकर यांनी दिली आहे.