मुंबई- उत्तर मुंबई लोकसभा मतदार संघात काल (सोमवारी) काँग्रेसचा बोरिवली रेल्वे स्थानकावर प्रचार रॅली चालू होती. या रॅलीत घुसलेल्या लोकांना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली. हे लोक भाजपचे असल्याचा आरोप काँग्रेस पक्षाच्या उमेदवार उर्मिला मातोंडकर यांनी केला आहे. उर्मिला मार्तोडकर यांच्या आरोपाचे खंडन खासदार आणि भाजप उमेदवार गोपाळ शेट्टी यांनी केले.
बोरिवली राडा प्रकरण : काँग्रेस कार्यकर्त्यांविरुद्ध भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याप्रकरणी संपूर्ण चौकशी करून मारहाण करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
याप्रकरणी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या विरोधात भाजपने निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी याप्रकरणी संपूर्ण चौकशी करून मारहाण करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक करावी, अशी मागणी भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
भाजप जिल्हाध्यक्ष विनोद शेलार यांच्यासह अनेक पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. काँग्रेसला जनाधार मिळत नसल्यामुळे अशाप्रकारे सामान्य लोकांना मारहाण केली जात आहे, असा आरोप आमदार प्रवीण दरेकर यांनी केला.