मुंबई- तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांची संपूर्ण तयारी आयोगातर्फे करण्यात आली आहे. निर्भय आणि मुक्त वातावरणात मतदान व्हावे, यासाठी आयोगाने काळजी घेतली आहे. सध्या कडक उन्हाचे दिवस असूनही मतदानाचे राष्ट्रीय कर्तव्य पूर्ण करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे, असे आवाहन अपर मुख्य सचिव तथा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्वनी कुमार यांनी केले आहे.
कडक उन्हातही नागरिकांनी मतदानाचे कर्तव्य पूर्ण करण्यासाठी पुढे यावे - अश्वनी कुमार - अश्वनी कुमार
महिला आणि युवकांनी निर्भय आणि भयमुक्त वातावरणात मोठ्या संख्येने सहभागी होवून मतदान करावे, असे आवाहनही अश्वनी कुमार यांनी केले आहे.
मुख्य निवडणुक आयुक्त अश्वनी कुमार, महाराष्ट्र
देशात लोकसभा निवडणुकीचा महोत्सव सुरू आहे. महाराष्ट्रातील २ टप्प्यातील निवडणुका सुरळीत पार पडल्या आहेत. २३ एप्रिल २०१९ रोजी होणाऱ्या तिसऱ्या मतदान टप्प्याप्रसंगी मतदारांमध्ये जनजागृती झाली पाहिजे. तसेच मतदारांनी मतदान प्रकियेत मोठ्या संख्येने सहभागी झाले पाहिजे. महिला आणि युवकांनी निर्भय आणि भयमुक्त वातावरणात मोठ्या संख्येने सहभागी होवून मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.