बुलडाणा- मासरुळ येथील 21 वर्षीय तरुणाची लाकडी फळी व दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली असून पारध तालुका भोकरदन येथील राजश्री शाहू महाविद्यालयाजवळ युवकाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळून आला. स्वप्नील श्रीरंग भुते (वय-21, रा. मासरुळ) असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसात अज्ञाताविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बुलडाण्याच्या मासरुळमध्ये तरुणाची दगडाने ठेचून हत्या
मासरुळ येथील 21 वर्षीय तरुणाची लाकडी फळी व दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
पारध भोकरदन रोडवरवरील राजश्री शाहू महाविद्यालयाजवळ असलेल्या श्रीरंग दगडू सुरडकर यांच्या शेतात बांधावर एका युवकाचा मृतदेह असल्याची प्रभू सुरडकर यांनी पारध पोलिसांना माहिती दिली. प्राप्त माहितीवरुन पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्यावेळी या युवकाचा लाकडी फळी व दगडाने ठेचून हत्या केल्याचे आढळून आले. या ठिकाणी मृताच्या खिशात असलेल्या आधार कार्डवरुन हा तरुण बुलडाणा जिल्ह्यातील मासरुळ येथील असल्याचे समोर आले.
त्यानुसार घटनेची माहिती मिळताच भोकरदन उपविभागीय पोलीस अभिकारी सुनिल जायभाये यांनीही घटनास्थळाला भेट दिली. आरोपींचा शोध घेण्यासाठी श्वान पथकलाही पाचारण करण्यात आले. मात्र, यामध्ये त्यांना यश मिळाले नाही. याप्रकरणी पुढील तपास सह पोलीस निरिक्षक शंकर शिंदे करत आहेत.