बुलडाणा - जिल्ह्याच्या चिखली तालुक्यातील कव्हळा गावातील महिला एकवटल्या असून गावातील अवैध दारूच्या भट्ट्या त्यांनी स्वतः पुढाकार घेत उद्ध्वस्त केल्या आणि संपूर्ण गावातील दारूबंदी करण्याचा निर्णय घेतला. गावात मागील अनेक वर्षांपासून अवैध दारू विक्रेत्यांनी थैमान घातले असून गावात हातभट्टीची दारू मोठ्या प्रमाणात विक्री होत होती.
दारूबंदीसाठी एकवटली नारीशक्ती, दारू भट्ट्या केल्या उद्ध्वस्त - भट्ट्या
बुलडाण्याच्या चिखली तालुक्यातील कव्हळा गावातील महिलांना एकवटून सर्व अवैध दारू भट्ट्या उद्ध्वस्त केल्या आहेत. त्याचबरोबर पोलिसांना दारूबंदी करण्यासाठी निवेदनही दिले आहे.
यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांना याची सवय लागली होती. त्यामुळे अनेक महिलांचे संसारही उघड्यावर पडले आहेत. ग्रामस्थांनी अनेकवेळा पोलीस प्रशासनाला याची माहिती देऊनही पोलीस अवैध दारू विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाई करत नव्हते. शिवाय त्यांनाच पाठिशी घालत होते. त्यामुळे गावातील महिलांनी एकत्रित येऊन अवैध दारूभट्ट्या आणि अवैध देशी-विदेशी विक्री होणारी दारू बंद केली असून स्वतः पुढाकार घेत हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि पोलिसांना निवेदन देऊन गावातील दारू विक्री बंद करण्याची मागणी केली.
हेही वाचा - 'ग्राहक न्यायमंच'चा निकाल अमान्य करणाऱ्या महावितरणच्या कंत्राटदारास 2 वर्षांची शिक्षा