महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

डिस्चार्ज दिल्याच्या 6 दिवसानंतर महिलेचा रिपोर्ट पॉझिटिव्ह, बुलडाणा रुग्णालयाचा कारभार

कोविड रुग्णालयातून एका कोरोनाबाधित महिला रुग्णाच्या बाबतीत प्रशासनाचे वाभाडे काढणारा एक अजबच प्रकार समोर आला आहे. ज्या कोरोनाबाधित महिला रुग्णाला प्रोटोकॉलनुसार दहा दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्या महिलेचा डिस्चार्ज झाल्याच्या तब्बल 6 दिवसानंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

बुलडाणा कोरोना अपडेट
बुलडाणा कोरोना अपडेट

By

Published : Jul 22, 2020, 11:16 AM IST

बुलडाणा - कोविड रुग्णालयातून एका कोरोनाबाधित महिला रुग्णाच्या बाबतीत प्रशासनाचे वाभाडे काढणारा एक अजबच प्रकार समोर आला आहे. ज्या कोरोनाबाधित महिला रुग्णाला प्रोटोकॉलनुसार दहा दिवसानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. त्या महिलेचा डिस्चार्ज झाल्याच्या तब्बल 6 दिवसानंतर कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. संबधित महिलेला पुन्हा क्वारंटाईन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, डिस्चार्ज दिल्याच्या एक दिवस अगोदर रॅपिड टेस्टमध्ये महिला कोरोनाबाधित म्हणून आढळली होती. असे असतानाही महिलेला डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाटय़ावर आला आहे.

संबधित रुग्णांच्या संपर्कातील आणि कुटुंबातील 6 जणांना मेहकर येथील कोविड रुग्णालयात क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला मेहकरच्या खाजगी रुग्णालयातून कोविड रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

मेहकर तालुक्यातील डोंडगांवच्या अंजनी येथील 60 वर्षीय महिलेला संशयीत म्हणून बुलडाण्याच्या कोविड रुग्णालयात 4 जुलैला भरती करण्यात आले होते. यावेळी त्यांचे स्वॅबचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. मात्र, 13 जुलैपर्यंत स्वाबचे अहवाल न आल्याने रॅपिड टेस्टद्वारे महिलेची तपासणी करण्यात आली. रँपिड चाचणीत त्यांना कोरोना असल्याचे स्पष्ट झाले. मात्र, रुग्णालयात भरती झालेल्या दिनांकापासून 10 उलटल्याने महिलेला 14 जुलैला डिस्चार्ज देण्यात आला. त्यानंतर 20 जुलैला महिलेचा प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवलेला कोरोना अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे समोर आल्याने एकच खळबळ उडाली आहे.

त्यावर, मेहकर आरोग्य विभागाच्या डॉक्टरच्या पथकाने महिलेच्या संपर्कात आलेल्यांना आणि कुटुंबीयातील दोन मुले, एक सून, दोन नातू यांना मेहकर येथील कोविड रुग्णालयात क्वारंटाईन केले आहे. तसेच संबधित महिलेचे पती यांची तब्बेत खराब असल्यामुळे त्यांच्यावर मेहकर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना आरोग्य विभागाच्या पथकाने खाजगी रुग्णालयातून मेहकरच्या कोविड रुग्णालयात भरती केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details