महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ओव्हरटेकच्या नादात पलटली वऱ्हाडाची बस.. एकाचा मृत्यू, 20 जखमी

औरंगाबाद येथून नांदुरा येथे वऱ्हाडाला घेऊन जाणारी खासगी बस (क्रमांक एमएच ईएफ 0714) ने जात होते. यावेळी देऊळगाव जवळ समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात बस पटली झाली. या अपघातात नयना नंदकुमार कुलकर्णी (वय 56) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर जवळपास 20 जण गंभीर जखमी झाले आहेत.

woman-dead-in-private-bus-accident-in-buldana-district
ओव्हरटेकच्या नादात वऱ्हाडाची बस पलटली...

By

Published : Mar 18, 2020, 9:45 PM IST

बुलडाणा- औरंगाबाद येथून नांदुरा येथे लग्नाचे वऱ्हाड घेऊन जाणाऱ्या खासगी बसचा देऊळगाव महिजवळ भीषण अपघात झाला. ही घटना आज दुपारी घडली असून या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर 20 जण जखमी झाले आहेत.

हेही वाचा-'कोरोना तपासणीसाठी रक्ताची चाचणी केली जात नाही', आरोग्य विभागाचा खुलासा

औरंगाबाद येथून नांदुरा येथे वऱ्हाडाला घेऊन जाणारी खासगी बस (क्रमांक एमएच ईएफ 0714) ने जात होते. यावेळी देऊळगाव जवळ समोरच्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात बस पटली झाली. या अपघातात नयना नंदकुमार कुलकर्णी (वय 56) या महिलेचा जागीच मृत्यू झाला. तर जवळपास 20 जण गंभीर जखमी झाले आहेत.

अपघाताची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. जखमी प्रवाशांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सायली वसंत गतमळे (वय 14 रा तेल्हारा), सखी प्रफुल इंगळे (वय 14 रा तेल्हारा), ज्ञानेश्वर विश्वनाथ तराळे (वय 45 रा. भोन), लिलाबाई मोतीराम इंगळे (वय 66 रा. संग्रामपूर), विनायक रामदास आरमाळ (रा. शिवणी आरमाळ), नंदा लक्ष्मण दळवी (रा. वडगाव), कल्पना विनोद अरबट (रा.अकोला), जयश्री श्रीकृष्ण तराळे (रा. भोन), आकाश अरुण तेलब (रा. बीड), कस्तुरा पुरुषोत्तम तराळे (रा. भोन), निखिल अरुण (राळे ,रा औरंगाबाद), मोतीराम मारुती इंगळे (रा. तेल्हारा), सुशिलाबाई तराळे (रा. तेल्हारा), सरस्वती इंगळे, अरुण लोखंडे, निनाद चिखलीकर, सृष्टी इंगळे, रेणू इंगळे, सुनंदा गुजारे, असे जखमी प्रवाशांचे नावे आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details