बुलडाणा - लग्नात हुंडा दिला नाही यासह विविध कारणांनी पतीसह सासरकडील मंडळींनी शारिरीक व मानसिक छळ केला. त्यामुळे या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना जलंब पोलीस ठाण्याअंतग॔त येणाऱ्या कठोरा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, विवाहितेने मृत्यूपूर्वी व्हिडीओ काढून आत्महत्या केली. मेधा पवन वाघ (रा. कठोरा, ता. शेगाव) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.
नातेवाईकांना VIDEO कॉल करून महिलेची आत्महत्या.. सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेचे टोकाचे पाऊल - बुलडाण्या विवाहितेची आत्महत्या
लग्नात हुंडा दिला नाही यासह विविध कारणांनी पतीसह सासरकडील मंडळींनी शारिरीक व मानसिक छळ केला. त्यामुळे या जाचाला कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना जलंब पोलीस ठाण्याअंतग॔त येणाऱ्या कठोरा येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
तुला स्वयंपाकच येत नाही.. जेवण जास्त करते.. असे वारंवार हिनवले.. हुंडा मिळाला नाही म्हणून शारीरिक आणि मानसिक छळ केला. हा त्रास असहाय झाल्याने २० वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना कठोरा (ता. शेगाव) येथे घडली आहे. गळफास घेण्यापूर्वी विवाहितेने आपल्या नातेवाईकाला व्हिडीओ कॉल करून सर्व घटना ऐकवली आणि गळफासाचे फोटो काढून आत्महत्या केली. या प्रकरणी पती, सासू, सासरा व दिराला जलंब पोलिसांनी अटक केली आहे.
मेधा पवन वाघ हिचे वडील देविदास राजुस्कर (रा. दसरानगर, शेगाव) यांनी या प्रकरणात तक्रार दिली आहे. त्यावरून पती पवन सुभाष वाघ, सासरा सुभाष वाघ, सासू महानंदा वाघ. दीर गणेश (सर्व रा. कठोरा) यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. चौघांविरुद्ध कलम 304 ब , 306, 498अ 34 भादंवि नुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पीएसआय राहुल कातकाडे हे करत आहेत.