बुलडाणा -जिल्ह्यात कोरोनाचा वाढता संसर्ग बघता यापूर्वीच नगर परिषदांचे क्षेत्र प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषीत करण्यात आले आहे. मात्र, आठवड्याच्या शेवटी बाजारात होणारी गर्दी लक्षात घेता जिल्हादंडाधिकाऱ्यांनी शनिवार व रविवारी कडक लॉकडाऊन लावण्याचे आदेश जारी केले आहेत. तसेच सर्व प्रकारच्या बाजारपेठ सोमवार ते शुक्रवार नियमितपणे सकाळी 9 ते सायंकाळी 5 दरम्यान सुरू राहणार आहेत. दरम्यान, या लॉकडाऊनला नागरिकांच उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
लॉकडाऊनमध्ये हे राहणार सुरू -
या लॉकडाऊनदरम्यान जिल्ह्यात दुध वितरण केंद्र सकाळी 6 ते दुपारी 3 तसेच सायंकाळी 6 ते रात्री 8.30 वाजेपर्यंत नियमितपणे सुरू असतील. सोबतच औषधी सेवा, दवाखाने, रूग्णवाहिका सेवा, एसटी वाहतूक 50 टक्के प्रवासी क्षमतेसह, माल वाहतूक, पेट्रोल पंप 24 तास सुरू असतील. टायर पंक्चरची दुकाने नियमित सुरू असतील. पुर्वनियोजीत परीक्षा वेळापत्रकानुसार होतील. बँकाचे कामकाज त्यांचे नियमित वेळेनुसार सुरू राहील.