महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यामध्ये पाणी फाउंडेशनच्या वाहनाला अपघात, २ जखमी - पाणी फाऊंडेशन

वरवट बकाल येथे पाणी फाउंडेशनतंर्गत निरीक्षणार्थी घेऊन जात असलेल्या चारचाकी वाहनाचा वरवट बकाल ते सोनाळा मार्गावार अपघात झाला.

बुलडाण्यामध्ये पाणी फाउंडेशनच्या वाहनाला अपघात, २ जखमी

By

Published : Apr 24, 2019, 5:31 PM IST

बुलडाणा- वरवट बकाल येथे पाणी फाउंडेशनतंर्गत निरीक्षणार्थी घेऊन जात असलेल्या चारचाकी वाहनाचा वरवट बकाल ते सोनाळा मार्गावार अपघात झाला. माकड आडवे आल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातमध्ये २ जण गंभीर जखमी झाले आहेत.

यामध्ये विजय झाडे (वय- ३८ रा. मांडवा) अमोल सोनोने (वय- २६ रा. मोताळा) हे जखमी झाले आहेत. संग्रामपूर तालुक्यातील ३४ गावांनी पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेत सहभाग नोंदविला आहे. श्रमदानातून ग्रामस्थ आपले गाव पाणीदार करण्यासाठी एकवटले आहेत. त्यांनी श्रमदानातून केलेल्या कामांचे निरीक्षण करण्यासाठी पाणी फाउंडेशनची जलसंधारण टीम ही मागील २ महिन्यांपासून संग्रामपूर तालुक्यातील गावांना भेटी देत आहेत. काल (मंगळवारी) सकाळी बोलेरो (एमएच-२८-व्ही-७९५१) या वाहनातून पाणी फाउंडेशनचे निरीक्षक जात होते.

त्यावेळी वरवट बकाल येथील सोनाळा मार्गावर वाहनासमोर अचानक माकड आडवे आले. त्यामुळे वाहन चालकाचे वाहनावरील ताबा सुटल्याने गाडीने झाडाला धडक दिली. यामध्ये २ जण जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी अकोल्याला पाठवण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details