महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सिंदखेड राजा, लोणार नगरपालिकेसाठी शांततेत मतदान

जिल्ह्यात लोणार व सिंदखेड राजा नगर पालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. दोन्ही नगर पालिकांमध्ये जनतेद्वारे नगराध्यक्षाची निवड होणार आहे.

मतदान

By

Published : Mar 25, 2019, 3:43 AM IST

बुलडाणा - जिल्ह्यात लोणार व सिंदखेड राजा नगर पालिका निवडणुकीसाठी आज मतदान पार पडले. दोन्ही नगर पालिकांमध्ये जनतेद्वारे नगराध्यक्षाची निवड होणार आहे.


या दोन्ही ठिकाणी सकाळपासूनच मतदारांचा उत्साह पाहायला मिळाला. मतदान शांततेत पार पडले. सकाळी ७.३० वाजतापासून मतदानाला सुरूवात झाली. अंदाजे आकडेवारीनुसार सिंदखेड राजा नगरपालिकेसाठी सायं ५.३० वाजेपर्यंत ७८.९४ टक्के व लोणार नगर पालिकेसाठी ७२.७८ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजाविला.

सिंदखेडराजा येथे थेट नगराध्यक्ष पदासाठी भाजपा युतीकडून सतीश भागोजी तायडे, काँग्रेस-राष्ट्रवादीकडून देवीदास वसंतराव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीच्या सुधाकर चौधरींचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. तर १६ नगरसेवक पदासाठी ३७ उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.


सिंदखेड राजा नगर पालिकेत एकूण १४ हजार ६५ मतदार आहेत. त्यापैकी सायं ५.३० वाजेपर्यंत ११ हजार १०३ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७८.९४ आहे.
लोणारमध्ये नगराध्यक्ष पदाचे पाच उमेदवार असून काँग्रेस-राष्ट्रवादी कडून पूनम पाटोळे , शिवसेना- भाजपा युतीकडून सुनिता राजगुरु, वंचित बहुजन आघाडी कडून मनीषा ज्ञानोबा, रासपकडून सुर्वणा मोरे वाघमारे तर अपक्ष म्हणून अयोध्या पसरटे रिंगणात आहेत. तर १८ नगरसेवकांच्या जागेसाठी ५८ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.


लोणार नगरपालिकेसाठी एकूण १८ हजार ७३७ मतदार आहेत. त्यापैकी १३ हजार ६३७ मतदारांनी मतदान केले. मतदानाची टक्केवारी ७२.७८ आहे.


दोन्ही नगर पालिकांसाठी २५ मार्च २०१९ रोजी सकाळी १० वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे. लोणार येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्था सभागृहात व सिंदखेड राजा येथे नगर परिषद सभागृहात मतमोजणी पार पडेल.

ABOUT THE AUTHOR

...view details