बुलडाणा - आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य व केंद्र सरकारने कामाच्या उद्घाटनाचा चांगलाच सपाटा लावला आहे. अशा उद्घाटनावेळी राजकीय नेते एकमेकांवर चांगलीच कुरघोडी करतांना दिसत आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे अशाच एका कार्यक्रमाला जिल्हाच्या दौऱ्यावर आले असता, त्यांनी मंचावर बसलेल्या शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्यावर अप्रत्यक्षरित्या टिकास्त्र सोडले.
विदर्भातल्या नेत्यांनी बँका सांभाळाव्या; दानवेंचा प्रतापराव जाधवांना अप्रत्यक्ष टोला - loksabha
चिखली पतसंस्थेच्या उद्घाटन कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार प्रतापराव जाधव, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेशाम चांडक यांच्यासह विविध पतसंस्थांचे अध्यक्ष तसेच राजकीय मंडळी उपस्थित होते.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये भाजप सेना हे दोन्ही पक्ष एकत्र लढणार आहेत. काही दिवसांआधी स्वबळाची भाषा करणाऱ्या सेनेने हिंदूत्वाच्या मुद्यावर पुन्हा एकदा भाजपचा हाथ धरला. मात्र, पक्ष नेत्यांकडून युतीची घोषणा करण्यात आल्यानंतरही काही ठिकाणी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये चांगलाच संघर्ष बघायला मिळत आहे. असाच काहीसा संघर्ष आज चिखली येथे एका पतसंस्थेच्या उद्घाटन समारंभावेळी पाहायला मिळाला. यावेळी कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, सहकार मंत्री सुभाष देशमुख, खासदार प्रतापराव जाधव, बुलडाणा अर्बनचे अध्यक्ष राधेशाम चांडकयांच्यासह विविध पतसंस्थांचे अध्यक्ष तसेच राजकीय मंडळी उपस्थित होते.
विदर्भातील लोकांनी पैसा सांभाळावा आणि आम्ही मराठवाड्यावाल्यांनी माणसे सांभाळावी. कारण विदर्भात बँका चांगल्या चालतात, अशाच एका विदर्भातील बँकेने माझ्या साखर कारखान्याला कर्ज दिले होते, ते मी वेळेत फेडले. यामुळे विदर्भातील लोक माझ्यावर विश्वास दाखवतात, असे कार्यक्रमच्या भाषणावेळी दानवे म्हणाले. हा दानवेंचा प्रतापरावांना मार्मिक टोला होता. कारण प्रतावरावांच्या सारंगधर साखर कारखान्याने बुलडाण्याच्या जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेकडून कर्ज घेतले होते. या कर्जाची ते परत फेड करु शकले नाहीत. त्यामुळे बँकेकडून कारखान्याचा लिलाव करण्यात आला. मात्र, त्यातूनही कर्जाच्या रक्कमेची परतफेड झाली नसल्याने हे प्रकरण आता न्यायालयात आहे. याच पार्श्वभूमीवर दानवेंनी जाधव यांना टोला लगावला. यावेळी माझे आणि खोतकरांचे मनोमिलन झाल्याचेही ते म्हणाले.