बुलडाणा- महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे पहिले घोषित उमेदवार आमदार बळीराम शिरस्कार आज (शुक्रवारी) दुपारी १२ वाजल्यानंतर लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरणार आहेत. यावेळी मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन करत ते आपला उमेदवारी अर्ज सादर करतील. विशेष म्हणजे बुलडाणा लोकसभा मतदार संघाचा हा पहिला अर्ज सादर होणार आहे.
वंचित बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी शेगाव येथे माळी समाजाच्या एल्गार मेळाव्यात वंचित बहुजन आघाडीचा उमेदवार म्हणून बाळापूरचे आमदार बळीराम शिरस्कार यांची लोकसभेच्या बुलडाणा मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. ते महाराष्ट्रातील वंचित बहुजन आघाडीचे पहिले उमेदवार होते.