महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Uddhav Thackeray : गुजरात निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे पळवले - उद्धव ठाकरे - उद्धव ठाकरे बुलढाण्यात टीका

शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांचा पश्चिम विदर्भातील पहिला शेतकरी मेळावा 26 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना त्यांनी राज्य सरकारवर टीका ( Uddhav Thackeray critics on State Government) केली.

Etv Bharat
Etv Bharat

By

Published : Nov 26, 2022, 9:23 PM IST

बुलढाणा- गुजरात निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून महाराष्ट्रातील उद्योग गुजरातकडे पळाविण्यात आले, असा गंभीर आरोप माजी मुख्यमंत्री तथा पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी केला. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा पश्चिम विदर्भातील पहिला शेतकरी मेळावा 26 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर विरोधीपक्ष नेते अंबादास दानवे, खासदार संजय राऊत, खासदार विनायक राऊत व खासदार अरविद सावंत तसेच निलम गोऱ्हे उपस्थित होत्या.

राज्य सरकारवर आरोप - ते पुढे म्हणाले की कर्नाटकच्या निवडणुका आहेत तेव्हा राज्यातील सरकार सोलापूर, पंढरपूर व अक्कलकोट हे कर्नाटकामध्ये विलीन करतील का ? असा प्रतिप्रश्न उपस्थित करून महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिळवण्याचे काम राज्यातील सरकार करत असल्याचा आरोपी ( Uddhav Thackeray critics on State Government) त्यांनी केला आहे.

पश्चिम विदर्भातील पहिला शेतकरी मेळावा 26 नोव्हेंबरला बुलढाणा जिल्ह्यातील घेण्यात आला. चिखली

मातीत गाडल्याशिवाय स्वस्त बसणार नाही - महाराष्ट्रातील खोके सरकार मातीत गाडण्यासाठी त्यांना धडा शिकवण्यासाठी राष्ट्रमाता जिजाऊच्या पावन भूमीतुन मी माझ्या दौऱ्याला सुरुवात केली आहे. या सरकारला मातीत गाडल्या शिवाय स्वस्त बसणार नाही, असा निर्णय उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केला. आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केली तुम्ही शेतकऱ्यांचे वीज माफ करणार आहात का, असा सवाल उपस्थित करून उद्यापासून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी कर्जमाफीचे पैसे मिळवून देण्यासाठी व हमीभाव मिळवून देण्यासाठी शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचे निर्देश यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना दिले.

ABOUT THE AUTHOR

...view details