महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्याच्या हतेडी गावाजवळ सापडले आई अन् मुलाचे मृतदेह

बुलडाणा तालुक्यातील हतेडी बु. गावाजवळील शेतातील विहिरीत 25 वर्षीय आई व 6 वर्षीय मुलाचे मृतदेह आढळल्याची घटना गुरुवारी (18 मार्च) उघडकीस आली आहे. रुपाली हरिदास चव्हाण व समर्थ हरिदास चव्हाण, असे त्या आई-मुलाचे नाव आहे.

buldana police
buldana police

By

Published : Mar 18, 2021, 3:01 PM IST

बुलडाणा- तालुक्यातील हतेडी बु. गावाजवळील शेतातील विहिरीत 25 वर्षीय आई व 6 वर्षीय मुलाचे मृतदेह आढळल्याची घटना गुरुवारी (18 मार्च) उघडकीस आली आहे. रुपाली हरिदास चव्हाण व समर्थ हरिदास चव्हाण, असे त्या आई-मुलाचे नाव आहे.

हतेडी बु. गावाजवळील सीताराम चव्हाण यांच्या शेतातील विहिरित हे मृतदेह आढळलेल्या घटनेची माहिती बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दोन्ही मृतदेहाचे पंचनामा करत घटनेची नोंद केली आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावांत खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हत्या की आत्महत्या हे अस्पष्ट

अचानक आई-मुलाचा मृतदेह विहिरीत आढळल्याने हत्या, आत्महत्या की अपघात आहे, याबाबत विविध तर्क-वितर्क काढले जात आहेत. मात्र, याबाबत अद्याप काहीच स्पष्ट झाले नसून पोलीस तपास करत आहेत.

हेही वाचा -बुलडाणा : माँ जिजाऊंच्या माहेराहून सावित्रीबाई फुले स्मृती ज्योती रवाना

हेही वाचा -बुलडाण्यात संपूर्ण लॉकडाऊन नाही, निर्बंधांसह दुकाने राहतील सुरू

ABOUT THE AUTHOR

...view details