महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात दुचाकीची एसटीला धडक; दोन जण जखमी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसला दुचाकी धडकल्याने दोनजण गंभीर जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे.

Twowheeler accident buldana
बुलडाण्यात दुचाकीची एसटीला धडक

By

Published : Feb 5, 2020, 2:52 AM IST

बुलडाणा -महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसला दुचाकी धडकल्याने दोनजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले आहे. एसटी बसला दुचाकीने पाठीमागून धडक दिल्याची प्राथमिक माहिती आहे.

हेही वाचा... हिवरे तिहेरी हत्याकांडप्रकरणी दोघांना जन्मठेप; सांगली जिल्हा न्यायालयाचा निर्णय

या अपघातात महादेव रामचंद्र झापर्डे (49) व नितीन दामोदर मुर्‍हेकर (27) हे दोघेजण जखमी झाले आहेत. मंगळवारी दुपारी शेगाव-खामगाव या रस्त्यावर हा अपघात घडला. या घटनेनंतर एसटी चालकाने स्वतः शहर पोलीस स्थानकात हजर होऊन माहिती दिली.

शेगाव-खामगाव रस्त्यावरील सवर्णा फाट्यावर ही बस खामगाव येथून शेगावकडे जात होती. त्यावेळी काही प्रवाशांना फाट्यावर उतरण्याकरिता बस उभी असताना मागच्या बाजूने बसला काहीतरी धडकल्याचा आवाज आला. याची पाहणी केली, तेव्हा बसला मागच्या बाजूने दुचाकी धडकल्याचे आढळून आले. तसेच दोन जण जखमी असल्याचे दिसले. यानंतर उपस्थितांनी त्या दोघांना उपचारासाठी रूग्णालयात नेले, अशी माहिती बस चालकाने पोलीसांना दिली आहे.

हेही वाचा... शरजील इमाम समर्थन प्रकरणी उर्वशी चुडावालासह 50 जणांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा

ABOUT THE AUTHOR

...view details