बुलडाणा- जिल्ह्यातील मलकापूर नजीक राष्ट्रीय महामार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडल्याने दुचाकीवरील दोघेही जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. ही घटना वाघुड गावाजवळ बजरंग दाल मिल समोर शुक्रवारी 12 जुलै रोजी दुपारी घडली आहे.
बुलडाणा : मलकापूर जवळ भरधाव ट्रकने दुचाकीला चिरडले; दोन जण जागीच ठार - वाघुड
दुचाकीस दोनशे मीटर घासत नेत ट्रक चालक ट्रक घेवुन घटनास्थळावरून फरार झाला आहे. गावकऱ्यांच्या मदतीने रुग्णवाहिकेद्वारे दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
दुचाकीस दोनशे मीटर घासत नेत ट्रक चालक ट्रक घेवुन घटनास्थळावरून फरार झाला. बजाज पल्सर दुचाकीने दोघेजण मलकापूरवरून नांदूराकडे जात असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकने जबर धडक दिली.
पोलीस पंचनाम्या दरम्यान मृताच्या खिशात असलेल्या कागदपत्रावरून विरेंद्र सिंग राजपूत आणि बलराम सिंग राजपूत (दोघे रा. पटोली जि. ताजापूर, इंदौर, मध्य प्रदेश) अशी मृतांची नावे असल्याचे समजले. गावकऱ्यांच्या मदतीने रुग्णवाहिकेद्वारे दोघांचे मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.