बुलडाणा -जिल्ह्यात कोरोना विषाणूमुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसत आहे. सोमवारी 22 जून आणि मंगळवारी 23 जून या दोन दिवसांत दोन रुग्णांचा मृत्यू झाला असून दोन्ही रुग्ण मलकापूर येथील आहेत. यामध्ये काळीपुरा येथील 70 वर्षीय महिला, तर मोमीनपुरामधील 55 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
बुलडाण्यात कोरोनाचे दोन बळी, मृतांची संख्या पोहोचली 10 वर - बुलडाणा कोरोना रुग्ण संख्या
जिल्ह्यात 2 हजार 273 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 166 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 122 कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात 34 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बुलडाणा कोरोना अपडेट
आतापर्यंत जिल्ह्यात 2 हजार 273 अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. जिल्ह्यात एकूण 166 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. त्यापैकी 10 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत 122 कोरोनाबाधित रुग्णांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात 34 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
आज 44 अहवाल प्रतिक्षेत आहेत. आजपर्यंत एकूण 2 हजार 273 निगेटिव्ह अहवालआले आहेत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.