महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

बुलडाण्यात 27 कोरोनाबाधित वाढले; रुग्णसंख्या सातशेच्या उंबरठ्यावर - बुलडाणा कोरोना न्यूज

बुलडाणा जिल्ह्यात शुक्रवारी 27 कोरोनाबाधित वाढले आहेत. यामुळे जिल्ह्यातील रुग्णसंख्या 696वर पोहोचली आहे. 310 जण कोरोनामुक्त झाले असून 20 जणांचा मृत्यू झाला आहे. 366 जणांवर उपचार सुरू आहेत.

Buldana corona update
बुलडाणा कोरोना अपडेट

By

Published : Jul 18, 2020, 2:56 PM IST

बुलडाणा : बुलडाण्यात दररोज कोरोनाबाधित वाढत आहेत. शुक्रवारी रात्री एकूण 296 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 269 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 27 अहवाल कोरोना पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 4 व रॅपिड टेस्टमधील 23 अहवालांचा समावेश आहे. निगेटीव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतून 23 तर, रॅपिड टेस्टमधील 246 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 269 अहवाल निगेटीव्ह आहेत.

शुक्रवारी 13 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामध्ये नांदुरा येथील 55 वर्षीय पुरुष, 18, 45, 20, 26, 9 वर्षीय महिला, इक्बाल चौक बुलडाणा येथील 43 वर्षीय पुरुष, नॅशनल स्कूलजवळ खामगांव येथील 40 वर्षीय पुरुष, खामगांव येथील 60 वर्षीय पुरुष, वाडी खामगांव येथील 35 वर्षीय पुरुष, आरोग्य कॉलनी शेगांव येथील 69 वर्षीय पुरुष, 25 वर्षीय पुरुष व सुलतानपूर ता. लोणार येथील 50 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे.

जिल्हा प्रशासनाकडे शुक्रवारपर्यंत 5844 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. 94 नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यात एकूण 696 कोरोनाबाधित रुग्ण असून त्यापैकी 310 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 366 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच 20 जणांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

वाढलेल्या कोरोना रुग्णांची तालुकानिहाय माहिती

खामगांव : बाळापूर फैल - 53 वर्षीय पुरुष, 28, 17, 40 वर्षीय महिला,

शिवाजी नगर : 45 वर्षीय महिला, 35 वर्षीय पुरुष. देशमुख प्लॉट 27 वर्षीय पुरुष.

देऊळगाव राजा :38 व 40 वर्षीय पुरुष, जुना नगर परिषद जवळ 24,59 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, अहिंसा मार्ग 67 व 52 वर्षीय महिला.

शेगांव :देशमुखपुरा 58 वर्षीय महिला व 27 वर्षीय पुरुष, टिचर कॉलनी 30 वर्षीय महिला, धनगर फैल 75 वर्षीय महिला, चिखली : डी.पी रोड 69 वर्षीय पुरुष, 60 वर्षीय महिला, जानेफळ ता. मेहकर : 42 वर्षीय महिला,

जळगांव जामोद : 25 व 59 वर्षीय पुरुष,

लोणार :सुलतानपूर 50 वर्षीय महिला

सिंदखेडराजा :कुंबेफळ येथील 56 वर्षीय महिला,

मलकापूर : 45 वर्षीय पुरुष

मोताळा :कोथळी येथील 47 वर्षीय पुरुष

अशाप्रकारे जिल्ह्यात 27 रुग्ण आढळले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details